Wednesday, August 12, 2009

कौशल्य?

कुठे शब्द स्पर्ष करतात
जेव्हा मन जुळलेले असतात,
नाती जन्माला का येतात
जेव्हा गाठीही बांधलेल्या नसतात

म्हणे कौशल्य असते
मैत्री करण्याचे,
उपजत की आत्मसात केलेले
तंत्र बंधन जोडण्याचें

किती क्षणभंगुर मग
हे जीवन शरणाचे,
कलेत का असते
सामर्थ्य भावनांचे

नको ही व्याख्या
परिमाने थोपन्याचे,
मैत्रीने ज्या झुगारले
मोहही शरीराचे;
मातीत बी रुजते
हे तर नियम प्रकृतीचे