कहाणी
ढगांचा काळोख
त्यात गर्जना वीजेच्या,
कुणी सम्राट जणू
स्वारीवर आलाये;
झौपलेल्या जगाला
जींकायला नीघालाये ।
कुणीही वाटेत आला
की कत्तल सेना करते,
वायुचे शस्त्र भुमीवरती
कल्लोळ असा माजवते;
नतमस्तक सारे
भूमीगत झाले,
वादळ आले रे आले म्हणत
गुहेत कुण्या शीरले ।
पादाक्रांत धरणी सारी
रक्तबंबाळ होवून वाहीली,
सार्या जखमांचा दुःख
भोकांड पसरवून गायली ।
देवालाही मग थोडी
उशीराच जाग आली,
सूर्याला पाचारण करीत
सांत्वना दीली ।
मग कंबर कसून
माणसे वर आली,
चार पीके त्याने
चाहू बाजूला पेरली ;
धरणी मग कशी
फुलून हसली,
हीरवा रंग आपला
काळजात भरून बसली ।
वार्याने उड़ता उड़ता
कानात खबर टाकली,
सम्राटाची कहाणी
जरा एईकू घातली;
प्रेम होत सार समजताच
धरणी आकाशात भीडली,
माझे चुकले म्हणत
पाउंसाची वाट पाहत बसली।
Thursday, June 12, 2008
Wednesday, June 11, 2008
माणुस
माणुस
कधी कधी कागदासारखाचमाणुस ही कोरा राहतो,
न जाणे की पाटीसारखा
हळूच पुसला जातो;
कमालच असेल ती शाई
जी गुणधर्मच वीसरून जाते,
अजबच असेल ते पाणी,
जे वाहतानां मातीही घेवून जाते।
काहीतरी घडत
जे अशक्य असत;
कींवा काहीही घडत नाही
जे अपेक्षीत असत;
षणात कुणीतरी
समुदरात वीलीन होत,
अस्तीत्व होत जे
पाकळीवरच्या थेम्बांसारख ।
मातीचीच पाटी
नी झाडेही मातीचीच,
पाउंसाचेच थेम्ब
आणीक समुदराचाच पाउंस;
पाउंस मातीशी मीळून
कीमया करत राहतो,
कधी माणुस
तर कधी पुतळे बनवीत जातो।
कुणी कीर्ती रुपे उरले
की फलक बनुन राहत,
दर पावसाळयात स्वच्छ धूवुन नीघत;
बाकी सारे मात्र
शांत पडून असतात,
मातीचा एक अंश बनुनूँ बसतात।