Thursday, November 20, 2008

मांजर

मांजर
दूर कुण्या कोपरयात
एक मांजर लपले,
एकटक या अंधारात
कुणास शोधत बसले?
कधी आवाज गाडीचा
तर कधी विजेचा,
कुठले गाणे बरे
एकदम असे हरपले?
रोजच पहाट होते
सायंकाळ्ही येते,
कुठल्या सूर्यासह गडे रोज
शरीर उन्हात नहाते?
असेल कुणी पैलतीरी
कींवा असेलही वीरान,
चंद्राला का असे
रोज मन पहाते?
दूध वाहत असले
तरी अर्धपोटी रहाते,
गंगेत मोक्ष मिळतो
कदाचीत त्या मांज़रास कळते!

Thursday, June 12, 2008

कहाणी

कहाणी
ढगांचा काळोख
त्यात गर्जना वीजेच्या,
कुणी सम्राट जणू
स्वारीवर आलाये;
झौपलेल्या जगाला
जींकायला नीघालाये
कुणीही वाटेत आला
की कत्तल सेना करते,
वायुचे शस्त्र भुमीवरती
कल्लोळ असा माजवते;
नतमस्तक सारे
भूमीगत झाले,
वादळ आले रे आले म्हणत
गुहेत कुण्या शीरले
पादाक्रांत धरणी सारी
रक्तबंबाळ होवून वाहीली,
सार्या जखमांचा दुःख
भोकांड पसरवून गायली
देवालाही मग थोडी
उशीराच जाग आली,
सूर्याला पाचारण करीत
सांत्वना दीली ।
मग कंबर कसून
माणसे वर आली,
चार पीके त्याने
चाहू बाजूला पेरली ;
धरणी मग कशी
फुलून हसली,
हीरवा रंग आपला
काळजात भरून बसली
वार्याने उड़ता उड़ता
कानात खबर टाकली,
सम्राटाची कहाणी
जरा एईकू घातली;
प्रेम होत सार समजताच
धरणी आकाशात भीडली,
माझे चुकले म्हणत
पाउंसाची वाट पाहत बसली

Wednesday, June 11, 2008

माणुस

माणुस
कधी कधी कागदासारखाच
माणुस ही कोरा राहतो,
जाणे की पाटीसारखा
हळूच पुसला जातो;
कमालच असेल ती शाई
जी गुणधर्मच वीसरून जाते,
अजबच असेल ते पाणी,
जे वाहतानां मातीही घेवून जाते
काहीतरी घडत
जे अशक्य असत;
कींवा काहीही घडत नाही
जे अपेक्षीत असत;
षणात कुणीतरी
समुदरात वीलीन होत,
अस्तीत्व होत जे
पाकळीवरच्या थेम्बांसारख
मातीचीच पाटी
नी झाडेही मातीचीच,
पाउंसाचेच थेम्ब
आणीक समुदराचाच पाउंस;
पाउंस मातीशी मीळून
कीमया करत राहतो,
कधी माणुस
तर कधी पुतळे बनवीत जातो
कुणी कीर्ती रुपे उरले
की फलक बनुन राहत,
दर पावसाळयात स्वच्छ धूवुन नीघत;
बाकी सारे मात्र
शांत पडून असतात,
मातीचा एक अंश बनुनूँ बसतात

Sunday, May 04, 2008

दगड

दगड
पाण्यात दगड भीरकावतांना
आपण वलय शोधत असतो,
दीसणारे पर्तीबींबं यत्कींचीत मीटावे
कदाचीत असाच वीचार करीत असतो
कैर्या तोडतानांही
दगड आकाशी जातो,
आबंटाएंवढ़ाच संताप शेजार्यांचा
आपणास अभीप्रेंत असतो
गुलेलाही कधी
काचा फोडू लागते,
मीळालेल्या चेडुंचा
खड्यांकरवी बदला घेवून देते
घर उभे करणयासही
दगडं उभारावी लागतात,
बर्याचदा माणंस त्याच
नीवार्यात रूपांतर करतात
पण शेंदुर फासलेला दगड
सर्वश्रेष्ठ असतो,
सत्यात नसलेल्या "माणसाला"
"माणलेल्या" देवासमोर आणून सोडतो
----------------------------------------
Friends of mine - Nem, Debashish, and Santosh were debating religion- that provoked these uncalled lines.

Friday, May 02, 2008

पीपंळ


पीपंळ
देवळातील वड- पीपंळ
नी घरातील तुळशी,
पावीतर्याचे पर्तीक असतात;
नीर्माल्य पाण्यात वाहून जाते,
पण ते देवासरखे
सदैव उभे असतात।
सकाळची पर्सन्नता
कींवा दुपारची सावली,
सायंकाळच्या एकांताचे
द्योतकाही ते असतात।
आँगण-गाव सुटले
की पोरकेपणा येतो,
वस्तीगर्हाच्या खोलीत
तुळशीला वाव नसतो,
म्ह्णायला मोठे ISKON असेल तरी
पींपळाचा अभाव असतो।
पींपळ देवळाला
तसा देवही पींपळाला,
असच काहीस संस्थैत घडल;
एक़ वीशाल वृक्श
दूसर्या मजल्यावर ,
दर्वाजाच्या बाजुस
चार फांद्या पसरवुन बसल।
माझी दुपारची सकाळ
नी पहाटैची रात्र,
त्या तटस्थ इतीहासकाराने पाहीली;
कधी खारीनां खेळवत
कधी घारीनां थांबवत,
मोठेपणाची जाणीव करुन दीली।
आपसुकच तो पींपळ
गावातलाच भासला,
माहेरच माणूस म्हणतात
तसा वाटला।
अनेकदा मी त्याला
सायंकाळी गाठला,
कधी बोडखा असतांना
कधी तांबडी पानं फुटतांना,
आमचा एक गहन
संवाद-कोश्च साठला।
पर्णानां स्पर्श करीत,
माझै दुःख मी मांडलै;
स्वतः गाढ़ शांत राहत,
शांततेच सारे पाठ त्याने
हलकेच मला गीरवले।
आनंदा क्षणही आम्ही
पावसात भीजतांना टीपले,
वर्तमानात आयुष्य असतै
हे स्वर्णीम अनुभवले।
भरकटत आज
नवीन गावी पोरका मी,
पीपंळ शोधतोये;
तो तटस्थ खंबीर उभे राहत,
कदाचीत माझी
वाट बघतोये
-----------------------
Before posting something new, I thought let me complete the triology of IISc nostalgia. I hope next post would be a bit different.

Wednesday, April 23, 2008

गुलमोहर
















गुलमोहर

तसा मी कही भीत नव्हतो
पण म्हणून उगाच उन्हात भ्ट्क्त नव्हतो;
घेत दुपारी छान झोप
संशोधानाला टाळत
होतो.
एक गोष्ट मात्र दर वर्षी झाली
चारही बाजूला रंगाची
मांड्णी मांडली;
नीसर्गाची धुळधान
अशी मुक्ता हस्ते झाली.
वैशाखात झाडांनी धमाल केली
लाल-पीवळी फुले उन्हात न्हाली;
सुर्याला वाकुल्या दाखवत
हसत उभी राहीली.
कोण सुंदर दीसते

म्हणत हळुच लाजली,
वाढ्त्या पारया बरोबर
अधीकच ट्वटवीत झाली.
उठ्ल्यावर रंग शोध्णे
संशोधना चाच मग भाग झाला,
कधी पीवळी तर कधी तांबडी
अल्हादाचा कल्लोळ माजला.
एक लाल गुलमोहर मात्र
नेहमीच काळजात भरला,
रोज रस्ती चालताना
चीमटा घाययाला वीसरला.
असे कही उन्हाळे
मी साठ्वत जगलो;
पुरेल शीदोरी
एवाढा आनंदी बहरलो.
आज मी बुलंद पुलांव्रून चालतो
इमार्तीनां गगनात पहातो;
गुल्मोहराचा एक लाल कोपरा मात्र
मी रक्ताने रंगवत राहतो.

ओली पहाट

ओली पहाट

चार थेम्ब हातावार हळूच ओघळलेले,
कावळैही सारे लपून बसलेले;
गारवा की धुके--साठून भरलेले,
रस्तया वर त्या कुणीही उरलेले;
एक इमारत नी पुतळा मात्र नेहमीच तेथे राहीले,
कडेच्या झाडां सारखे घट्ट रोवून बसले.
रोज उन्हात नी रात्री कीती लोक आली,
फारसा काही सम्जता अशीच नीघून गेली;
त्यांचे मीष्कील हशने,
प्रत्येकाला फसवत गेले.
मी साइकल स्वार रोज गुजर्णारा,
ओल्या चीबं दीवशीही भेट रस्तयाला देणारा;
एक पहाट मात्र काही कुजबुजली,
तो पुतळा बोलतो अस भासवून गेली;
मी सावध रोज मग आवाज़ एईकू लागलो,
सुंदर कही शब्द कानी घेत राहीलों;
बोध मात्र त्याचा उमगला मला नाही,
का कुणास ठाउक कधी प्रय्त्नच केला नही.
आज मात्र ते सारे आठवत
मन भरुन येत,
पुतळैही बोलतात
ओल्या पहाटै सांगुन जात.

---------------
I hope my friend prashant will find some solace now. Thanks indeed to him though for this substantial suggestion on improvement.

Friday, April 18, 2008

Restart!

Hazzaron Khawhishen Aisi,
Ki Har Khawhish Pe Dum Nikale;
Bahot Nikale Mere Armaan,
Lekin Phir Bhi Kam Nikale.

These phrases rendered by Jagjit Singh, are reminder of human life and thereof various aspects of it that we do not wish to pay heed in public. If any amongst my friend finds that someone talks of me as a really introvert or less talkative person, they are going to have loud laugh. But then this is what their perception is--or rather I fail to talk enough in my own standards--that makes me say here that Silence is something I cherished and loved. A two or so persons in my life have had only a glimpse of this dragon, which can engulf a ordinary soul. None is capable of handling those emotional clouds, which stir me into extremeness of life. Perhaps only people born under Scorpio sun sign will understand, what I mention of. These emotions sometimes get translated into few stanzas, which few might call as poetry.

Almost all of my poetry had been very personal, normally something very special written for my friends or those many infatuations in my life. From Today I wish to break over constraints--let who ever is interested--read and criticise the amateur lines.
By the way---md is my initial--and the title restart is just to pinch me that I shouldn't stop blogging at least this time. So here it goes ------------


OLI PAHAT

Char themb hatawar hulach oghallele
Kawalehi sare lapun basalele;
Garawa ki dhuke--sathun bharlele,
Rastya war tya kunihi na uralele;
Ek imarat ni putla matra nehmich tethe rahile,
Kadechya jhadan sarkhe ghatta rowun basale.
Roj unhat ni ratri kiti loka aali,
pharsa kahi na samjata ashich nighun geli;
Tyanche mishkil hashne,
Pratyekla phaswat gele.
Mi cycle swar roj gujarnara,
Olya chimba diwashihi bhet rastyala denara;
Ek pahat matra kahi kujabujali,
To putla bolato asa bhasawun geli;
Mi sawadh roj mag awaz eiku lagalo,
Sundar kahi shabda kani ghet rahilo;
Bodh matra tyach umagla mala nahi,
Ka kunas thauk kadhi prayatnach kela nahi.
Aaj matra te sare aathwat
man bharun yete,
putlehi boltat
olya pahate sangun jate.


P.S.-- 1. All the IIScians ---having seen Tata Statue will understand the essence of these lines.
2. Most of the poems like this one, would be in either Marahi and Hindi; given my superior vocabulary of English :) .