गुलमोहर
तसा मी कही भीत नव्हतो
पण म्हणून उगाच उन्हात भ्ट्क्त नव्हतो;
घेत दुपारी छान झोप
संशोधानाला टाळत होतो.
एक गोष्ट मात्र दर वर्षी झाली
चारही बाजूला रंगाची मांड्णी मांडली;
नीसर्गाची धुळधान
अशी मुक्ता हस्ते झाली.
वैशाखात झाडांनी धमाल केली
लाल-पीवळी फुले उन्हात न्हाली;
सुर्याला वाकुल्या दाखवत
हसत उभी राहीली.
कोण सुंदर दीसते
म्हणत हळुच लाजली,
वाढ्त्या पारया बरोबर
अधीकच ट्वटवीत झाली.
उठ्ल्यावर रंग शोध्णे
संशोधना चाच मग भाग झाला,
कधी पीवळी तर कधी तांबडी
अल्हादाचा कल्लोळ माजला.
एक लाल गुलमोहर मात्र
नेहमीच काळजात भरला,
रोज रस्ती चालताना
चीमटा घाययाला न वीसरला.
असे कही उन्हाळे
मी साठ्वत जगलो;
पुरेल शीदोरी
एवाढा आनंदी बहरलो.
आज मी बुलंद पुलांव्रून चालतो
इमार्तीनां गगनात पहातो;
गुल्मोहराचा एक लाल कोपरा मात्र
मी रक्ताने रंगवत राहतो.
No comments:
Post a Comment