शोधसी कुणास
या धुक्यात सवालीचाही
नसे आभास
हवेत चाचपड्ती हे हात
कुठल्या वादळाला।
शमेल ते तूफ़ान
असे वाटे जरी आज
ज्याचा आरभंही न पाहिला
त्या दिव्याचा
प्रकाश खुंटेल का।
विझतात वाती सा-या
नी तेलही सरे
विस्तारणा-या आगीत
कुठली राख जळे।
भस्म माथ्यावरचे
पिढ्यान पिढ्या वारसा हाताळे
हस्तक कोण
कुणी सांगावे।
सांगाव्यास कुणी
विसरुनी गेले
शोधा - शोधा अरे
काय हरविले।
No comments:
Post a Comment