Thursday, December 24, 2009

बाक

स्थित्यंतरे किती पाहिलीत
या इथे स्थिरावर होवूनी
क्रमशः जोपासलेले
काही गीते काही आठवणी।

प्रवासी क्षणभराचे
घटकेला विसावलेले
धाव कुठलीतरी
तरीही थोडेसे जकडलेले।

अस्तित्व माझे
दुर्लक्षित कधी - कधी आपुलेसे
जाणीव पुर्वक कधी कोण
मजसी बोलले।

ऋतुं सारखेच
येणे जाणे लागलेले
वाट कुणाला कुणाची
मी इथेच - कुणासाठी।

माझ्या भाग्यी
चलचित्राचे जीणे
या बाकावर रोजच
कुणी पाहुणे - कुणी मज बिलगलेले

No comments: