माझ्या गारठलेल्या हातांना
शेकोटीची उब हवीये
मफलर आणि माकड टोपीत
गल्लीच्या टोकाला गंमत हवीये।
पहाटे उठून चोरीच्या लाकडांना
जाळण्याचे सुख हवय
कुत्रे भुंकत असताना
त्यांना धमकवण्याची उसनी हिम्मत हवीये।
धुक्यातून सूर्य किरण टिपतांना
क्षितिज सामावल्याचा भास हवाये
काचेवर दवात नाव कोरतांना
सोन्याची किनार हवीये।
सकाळ जी जीवलगांना
दाटीवाटीच्या शेजारी घुटमळत सोडेल
ती हिवाळी बात
परत अनुभवनयाची संधी हवीये।
No comments:
Post a Comment