आठवणींच्या रांगोळया
काढत बसलोये
प्रभात नाही
मध्यरात्रच आहे
चंद्राला रंग सापडलेयेत
मी चांदणीशी खेळत बसलोये.
कधी फुल
तर कधी षटकोण
कधी आखीव
नाहीतर कधी रुपबद्ध
ठिंबांनीं साचेबध्द
तर कधी मुक्त हस्त.
एक दीप मध्यभागी
कधी पायाशी स्वस्तींक
आमंत्रणच जणू
इवल्याश्या वस्तीत
जेथे नांदतात
कुणी परीमळ.
त्या घरात
नि गोठ्यात
किती हबंरणे ऐकीले
चंद्रा शोध रे जरा
आज दुधावीणा
वासरू कुठे भटकले.
No comments:
Post a Comment