Tuesday, October 06, 2009

अक्षर

प्रतिकार करताही येतो
पण नेहमीच बोलवेल अस नाही
कुठे उमजलिये भाषा आम्हाला
शब्दांच आंगण पेलवेलच अस नाही

अमोघ आणि अबोल
मृदु असतात काही जोडाक्षरं
निसटले तर माती होते
पण मातीला कळणार नाही अस नाही

संवादाच्याही पलिकडे
सौंदर्य असते कुणाकडे
कळेल सारयांणा अवचित
एवढ़े सुलभ उकार असतील अस नाही

जपणूक धाग्यांची हळुवार असे सारी
गुंतले की आपलेसे होतात
कुठे बिंदु कुठे खंड वापरावे
सोनेरी होतील अक्षर सारेच अस नाही

No comments: