ये रात्र तू ये
तुझी गरज तशी फार नाहीये
पण अंधारात अंधार विस्तारला
तर फार हरकत नाहीये।
हो तू म्हणशीलच
की रोजचा हा तुझा दिनक्रम
पण दिवस हिरावून तू येतेस
म्हणून तुला ही आठवण।
नाही तुझ्याशी वैर नाही
सुखद निद्रा नी स्वप्न देण तुझी
पण जेव्हा दिवास्वप्न बघत निद्रानाश होतो
रवीची आहुतीही मग तुझ्याच कुशी।
राग किंवा तुझा क्षोभही नाही
अस्तित्वाशी कशाला करायची लढाई
साम्राज्य तुझे हरवते पृथ्वीलाही
चंद्राची कोरही विस्फारून अमाव्यस्या पाही।
तूच आता खर तर झालीस आई
तुझ्यातच विलीन होईल ही माझी शाई
ये रात्र तू ये
जगणे आणि मरणे यात आता कुठला फरक नाही।
No comments:
Post a Comment