चंद्राचीही ज्योत
कधी मावळते विझते
लख़्ख प्रकाश पौर्णिमेचा
अमावस्या हिरावते;
ग्रहणही त्यात
एक भरण घालते
समुद्र किनारी
एक कल्लोळ माजवीते।
चांदणीही नेहमीच अशी
दूर राहते
वेठीस धरून रात्रीला
स्वःताशीच हसते;
ढगांनाही मधेच युक्ति सुचते
काळोख आकाशी पसरुवनी
लपंडाव एकाकीचा
सारी पृथ्वी खेळते।
मी बापडा एक
तुझ्या प्रेमात ग वेडा
देवाला साकळे घालतो
सखे तु येणा - येणा;
मला ओलीस धरून
तु चंद्र चांदणी पाहतेस
पृथ्वी, किनारा, नी हा समुद्र तुझा
नेहमीच का असा बाजूला लोटतेस।
भरती नी ओहटी
तर मी रोजच जगतो
कधी आठवण तुझी
तर कधी तुला स्मरतो;
एका रात्री तु येशील
म्हणून मी खडकच झालो
लाटांनाही आता
मी नवा न राहिलो।
आज दिवा मात्र एक
कुणी चरणी वाहिला
पण तु आलीस कधी
मला थांग-पत्ता न लागला;
गंगा माझे जीवन
तु पवित्र करतेस
जग सुखकर झाले की दुःखकर
स्पर्शुनी विचारतेस।
उरलो न मी आता
कुणी दुजा तुजसाठी
ही रात्र, चंद्र, नी चांदणी
हसतेये बघ आपुल्यासाठी;
मधुर आहेत सारे
ग प्रेमाचे हे धागे
ग्रहण, अमावस्या, नी ढग
हे ऋतु आकाशाचे।
किनाराच जर आता
आपुले घर झाले
पृथ्वी नी आकाशात
मग का अंतर उरले;
पौर्णिमेचा लपंडाव
एक नवीन पर्व
थोड़े तुझे थोड़े माझे
हे आयुष्याचे बंध - उटण्याचे सुगंध - आता सबधं।
No comments:
Post a Comment