किती समुद्रसफरी केल्या
तरी निनावीच जगावे लागले
शिळाच होत्या सारया
अधांतरी नव्हे बुडाशीच जाणे आले।
नक्षीदार किती पाट्या
तरी रंग विरून गेले
जे हवे होते सारे
हवेतच शिरून गेले।
महाल अनं झोपड्या
विटा बांबुचे खेळ झाले
जगणारे कुणी होते
आता श्लेषही न उरले।
संश्लेष जुने सारे
निसरड्या वाटा सारया
शेवाळे किनारी असतात
कुणास कसे न माहित झाले।
No comments:
Post a Comment